पुणे : सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या धोरणा विरोध करण्यासाठी पुणे मिठाई फरसाण डेअरी असोसिएशने आज बंद पुकारला आहे. या विरोधात आज व्यापाऱ्यांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. चितळे बंधूही या बंदात सहभागी झाले आहे.
सरकारने सरसकट प्लॅस्टिकबंदी केली आहे. कोणते प्लॅस्टिक वापरायचे आणि कोणते नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो पण त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे.
मिठाई, डेअरी आणि फरसाण व्यावसायिकांना प्लॅस्टिकबंदीचा मोठा फटका बसत आहे. प्लॅस्टिकबंदी करताना सरकारने कोणताही पर्यायही उपलब्ध करून दिलेला नाही. म्हणुनच पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनने आज बंद पुकारला आहे. सरकारने धोरण न सुधारल्यास बेमुदत बंद करण्याचा इशाराही असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.
चितळे बंधूही सहभागी
पुणे म्हटलं की इतरांना दुपारी 1 ते 4 या वेळेत बंद असणारी दुकानंच डोळ्यासमोर येतात. मात्र आज 25 जून 2018 हा दिवस पुणेकरांसाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. चितळेंचं दुकान आज संपुर्ण दिवस बंद राहणार आहे.
प्लास्टिकबंदीविरोधात पुण्यात मिठाईची दुकानं बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2018 03:51 PM (IST)
सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या धोरणा विरोध करण्यासाठी पुणे मिठाई फरसाण डेअरी असोसिएशने आज बंद पुकारला आहे. या विरोधात आज व्यापाऱ्यांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. चितळे बंधूही या बंदात सहभागी झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -