बीड : 'मुस्लिमांच्या शरियतमध्ये ढवळाढवळ करू नका. अन्यथा मुस्लीम समाज जागा होऊन तुम्हाला जागा दाखवेल,' अशा कडक शब्दात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. . बीडमधील संविधान बचाव रॅलीमध्ये ओवेसी बोलत होते.


'सरकार मनमानी करुन मुस्लीम जनतेवर निर्णय लादणार असेल तर सरकारला मुस्लीम समाजाची ताकद दाखवून देऊ', अशा शब्दात ओवेसी यांनी सरकारला ठणकावलं आहे. ओवेसी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहाप्रमाणे वागत आहे. तिहेरी तलाक पद्धतीच्या विरोधात कायदा करणार असल्याचं सांगताना आमच्या शरियतमध्ये कशासाठी ढवळाढवळ करता? असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.


'शरियत कायद्यात बदल करण्याचा विचार करू नका. सरकारचं हे असंच सुरू राहिलं तर मुस्लीम समाजातील तरुण रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतील. वेळ पडल्यास जीव देऊ, मात्र मागे हटणार नाही', असा इशारा ओवेसी यांनी यावेळी दिला.