'सनबर्न'ला आणखी एक दणका, दंडाची रक्कम 1 कोटींवर
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2016 01:24 PM (IST)
पुणे: पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला आणखी एक दणका बसला आहे. प्रांताधिकाऱ्यानंतर आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानेही दंड ठोठावला आहे. 'सनबर्न'साठी जागा घेताना पाच वर्षाच्या करारावर घेण्यात आली. पण त्यासाठी भाडेपट्टा शुल्क न देता, भाडे करारापोटी किरकोळ रक्कम देऊन हा व्यवहार करण्यात आला. त्यावर कारवाई म्हणून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं सनबर्नला 42 लाख रुपये दंड ठोठावला.