हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत.
सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?
सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद गावातील डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं. मात्र यासाठी तहसीलदार किंवा जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी आवश्यक होतं. पण आयोजकांकडून सपाटीकरणासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रांताधिकरांनी आयोजकांना दणका दिला.
केसनंद परिसरात डोंगराचं सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
सनबर्नकडून 1 कोटी 77 लाखांचा करमणूक कर
दरम्यान, पुण्यात 28 ते 31 डिसेंबरदरम्यान सनबर्न फेस्टिव्हल रंगत आहे. त्यामुळे सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली केली आहे.
आयोजकांनी 1 कोटीचा डीडी आणि 77 लाखाची रोकड जिल्हा करमणूक कर विभागाकडे जमा केली आहे.
संबंधित बातम्या