बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2017 10:36 AM (IST)
बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे
पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. किर्ती शेरे असं या 25 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. याप्रकरणी सीआरपीएफ कमांडोसह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिलेल्या पत्रात विद्यार्थिनीने आठ जणांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आठ जण आपल्याला ब्लॅकमेल करत होते. तसंच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी देत असल्याचं तरुणीने पत्रात म्हटलं आहे. सीआरपीएफ कमांडो गणेश राऊतसह सगळ्यांना शिक्षा देऊन मला न्याय द्यावा, अशी मागणी किर्तीने पत्रात केली आहे. तसंच माझ्या आत्महत्येप्रकरणी घरच्यांना जबाबदार धरु नये असंह किर्तीने म्हटलं आहे. एफआयआर