पुणे : राजगडावर फिरायला गेलेल्या एका तरुणाचा (Trek) राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू (Tourist Death) झाल्याची घटना घडली आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटकांचे पाय पर्यटन स्थळांकडे (Tourist Spot) वळले आहेत. त्यामुळे किल्ल्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय-33 रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लि. कंपनीत काम करीत होता.
ठाण्यातील चार पर्यटक पुण्याजवळील राजगडावर ट्रेकसाठी गेले होते. रात्रीचा ट्रेक होता.रात्रीच्या सुमारास अजय जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. मित्रांनी त्यांचा बराच वेळ शोध घेतला मात्र तो सापडला नाही शेवटी सकाळी तो पाण्याच्या टाकीत आढळून आला.
हरिचश्चंद्रगडावर एकाचा गारठून मृत्यू
काही दिवसांपूर्वी हरिचश्चंद्रगडावर प्रचंड पाऊस आणि दाट धुक्यामधुन वाट चुकलेल्या एका पर्यटकाचा पावसात भिजल्याने गारठून मृत्यू झाला होता अनिल नाथाराव गिते ((वय 35) लोहगाव,पुणे) असे मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नाव आहे. हपुण्यातील लोहगाव भागातील अनिल गिते,अनिल आंबेकर,गोविंद आंबेकर,तुकाराम तिपाले,महादु भुतेकर,हरिओम बोरुडे हे सहा पर्यटक हरिश्चंद्रगडावर फिरण्यासाठी आले होते. मात्र मुसळधार पाऊस,घनदाट झाडी आणि रात्र झाल्याने ते सहाहीजण रस्ता भरकटले आणि वेगवेगळ्या दिशेने गेले,सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्यातीलच एका पर्यटकाचा भिजून मृत्यू झाला होता.
त्यांनी स्थानिक रहिवासी आणि वन्यजीव विभागाच्या कर्मच्याऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांनी एकमेकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना अनिल गिते हे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी अनिल गिते यांचा मृतदेह गडाच्या पायथ्याशी आणण्यात आला होता. दोन्ही घटनानंतर ट्रेकला जाताना काळजी घेण्याचं आवाहन दरवर्षी करण्यात येतं.
ट्रेक करताना कोणती काळजी घ्याल...
-एकट्याने ट्रेकिंगला जाण्यापेक्षा एखाद्या संस्थेतून किंवा ग्रुपसोबत जाणे केव्हाही चांगले.
-ट्रेकिंग गाईड सर्व ट्रेकिंग उपकरणे पुरवत असल्याची खात्री करा.
-ट्रेक करताना लवकर वाळणारे कपडे घाला.
-शक्यतो ट्रेकिंग शूज घाला.
-तुमचे गॅझेट पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 2 मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जा.
-रेन कोट बाळगायला विसरू नका.
-ट्रेकिंग दरम्यान हायड्रेटेड रहा.
-जंगल आणि चिखलातून फिरताना जळू तुमच्या पायांवर हल्ला करत असल्यास जळू ओढू नका.
-प्रथमोपचार किट वापरा किंवा डॉक्टरांना भेट द्या
-माहीत नसलेल्या मार्गाचा अवलंब करू नका.
- तुमच्या मार्गदर्शकाच्या सूचनांप्रमाणेच ट्रेक करा.
-निसरड्या रस्त्यांवर चालताना काळजी घ्या.
-वाटेत नदी-नाले ओलांडताना अतिसाहस करू नका.
-नदी लहान असली तरी प्रवाहाच्या वेगामुळे वाहून जाण्याचा धोका असतो.
-फोटो काढण्यासाठी डोंगराच्या बाजूला किंवा तलावाजवळ जोखमीची पोझेस देऊ नका त्यामुळे तोल जाण्याची भीती असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :