Pune News : पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर (Accident News) धरणात गाडी कोसळली. वरंधा घाटात दाट धुके असल्याने आर्टीगा गाडी नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही वेळापूर्वी गाडी कोसळली. गाडीत चारजण होते. एकजण सुखरुप आहे, मात्र त्याच्यासोबत गाडीत असणारे तिघेजण सापडलेले नाहीत. हे तिघेजण गाडीसोबत पाण्यात बुडाले असण्याची शक्यता आहे. त्यांचा विविध स्थानिक पथकांकडून शोध घेतला जात आहे. 


पुण्यातील अनेक परिसरात सध्या दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणारा वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पण त्यानंतरही काही नागरीक स्वतःचा जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करत आहे. हाच प्रयत्न शनिवारी 3 प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे. हे प्रवासी रावेतमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


ही कार पुण्यातील आहे. पुण्यातील प्रवासी पुण्याहून वरंधा घाटमार्गे कोकणाकडे निघाले असावे, असा अंदाज आहे. या कारमधून 3 पुरुष आणि 1 महिला असे एकूण 4 जण प्रवास करत होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले. तर अन्य तिघे धरणात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या धरणात बुडालेल्या 3 प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.


वरंधा घाटातील वाहतूक  30 सप्टेंबरपर्यंत बंद


या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या भागाकडे जाण्यासाठी हा सर्वात लहान मार्ग असल्याने, दोन्ही जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वाहने घाट भागाचा वापर करतात. मर्यादित लेन आणि अचानक येणार्‍या वळणांमुळे गर्दी होत असल्याने ही वाहने घाटात वारंवार अडकतात. पावसाळ्यात या घटना नियमित घडतात. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि नागरिकांंचं नुकसान होऊ नये, यासाठी सगळ्या स्तरावरुन दरवर्षी प्रयत्न केले जातात. वरंध घाटाबरोबरच पुण्याजवळील काही भीतीदायक किंवा आपत्तीजनक पर्यटन स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai : मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले चाबड हाऊसचे फोटो; पोलीस यंत्रणा सतर्क