Pune News : राहण्यासाठी (Pune)योग्य शहर अशी पुण्याची ओळख आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरातील नागरिक पुण्यात नोकरीसाठी येतात आणि पुण्यातच स्थायिक होतात. त्यामुळे पुण्यातील जागेच्या आणि घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पुण्यात एकीकडे घरांची विक्री वाढत असल्याचे सकारात्मक चित्र दर्शवले जात असताना दुसरीकडे पुण्यात मात्र अजूनही 1 लाख घरं विक्रीविना पडून असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. अनारॉक रिसर्च तर्फे एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात ही आकडेवारी देण्यात आली आहे.


अनारॉक रिसर्चतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार पुण्यात अजूनही 1 लाख घरे विक्री विना पडून आहेत. हे प्रमाण देशातील सात प्रमुख शहरांमधील घरांच्या तुलनेत 16 टक्के इतकं आहे. या घरांच्या विक्रीसाठी भरपूर वेळ लागू शकतो, असं अहवालातून समोर आलं आहे. सुमारे 23 महिने लागू शकतील, असा किमान अंदाज बांधण्यात आला आहे. 


या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबरमध्ये या कालावधीत अधिक घरांची भर पडली आहे.  त्यामुळे घरांची उपलब्धता वाढली आहे. मात्र त्या तुलनेत घराच्या विक्रीचा वेग स्थिर आहे. विक्रीचा वेग वाढत नसल्याने ही घरं पडून असल्याचं समोर आलं आहे. 


उत्तर पुण्यात सर्वाधिक 38 टक्के घरे विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि त्यानंतर पश्चिम पुण्यात 33 टक्के घरे उपलब्ध आहे. शहराच्या उपलब्ध यादीतील बहुतेक गृहनिर्माण संस्था या मध्यम स्वरूपातील घरे या स्वरूपात आहेत आणि उपलब्धतेत एकूण 45% योगदान देतात. परवडणाऱ्या घरांचे प्रमाण  26% टकके आहे, असं या अहवालात सुचित करण्यात आलं आहे. 


पुण्यातील घरांच्या विक्रीत पहिल्या सात शहरांमध्ये सर्वाधिक 13% ची वाढ नोंदवली गेली आहे. 2022 च्या मध्ये 14,100 निवासी युनिट्स विकल्या गेला आहे. त्यामुळे पहिल्या सात शहरांमधील एकूण घरांच्या विक्रीत पुण्याचा वाटा 16% होता, असं अॅनारॉक समूहाचे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख संशोधन प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं आहे. 


शहरात विक्रीचा वेग कायम 
शहरात बांधकामांची अतोनात वाढ झाली आहे. 45,800 नव्या निवासी युनिट्स जोडल्या गेल्या आहेत. या नव्या असलेल्या युनिट्समुळे घरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घरं पडून आहेत. मात्र विक्रीचा वेग कमी झाला नाही आहे. घरं जास्त झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं आहे.