Lonavala Drone :  लोणावळा (lonavala) एअरफोर्स परिसरात विना (Pune crime) परवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवाई दलाचे पोलीस अधिकारी मोहम्मद यांनी तक्रार दिली होती. अर्शद आलम असं या तक्रार दिलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  


राहुल बालकृष्ण बडोले असं ड्रोन उडवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मूळचा भंडाऱ्याचा आहे आणि तो मुंबई कामाला आहे. ही घटना रविवारी घडली. लोणावळ्यातील हवाई दल आणि आयएनएस शिवाजी ही संवेदनशील ठिकाणे असतानाही जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्या व्यक्तीने या भागात ड्रोन उडवले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


प्री-वेडिंंग शूटसाठी देखील गुन्हे दाखल 


लोणावळ्यात अनेक चांगले निसर्गरम्य ठिकाणं आहेत. या ठिकणी अनेक नागरिक प्री-वेडिंग शुटसाठी येत असतात. सध्या सगळीकडेच प्री-वेडिंग शुटची भूरळ बघायला मिळते. त्यासाठी चांगली ठिकाण निवडली जातात. त्या ठिकाणी शूट केलं जातं. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे वापरले जातात. ड्रोन कॅमेरादेखील सर्रास वापरला जातो. त्यांच्यावरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 



नाशिकमध्ये ड्रोन उडवला अन् ड्रोन मालकांची माहिती मागवली? पुणे पोलीस कधी मागवणार?


नाशिकमध्ये (Nashik) लष्करी हद्दीत एक महिन्यात दोनवेळा ड्रोन (Drone) उडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. यानंतर संरक्षण विभागासह गृह विभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी देखील नाशिक शहर परिसरात नो ड्रोन फ्लायझोन निश्चित करत ड्रोन उडवण्यावर बंदी घातली होती. त्याचबरोबर शहरातील ड्रोन मालक, चालकी यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. त्या सर्वांचे ड्रोन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले होते. असा आदेशच काढल्याने सर्वच ड्रोन चालकांचे धाबे दणाणले होते. मात्र या निर्णयामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रोन चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरम्यान सद्यस्थितीत नाशिक पोलिसांकडे 17 ड्रोन असून उड्डाणावरील निर्बंधात वाढ करण्यात आली असून ड्रोन चालक मालकांना नोटिस पाठवण्यात आल्या होत्या. त्याच प्रमाणे पुण्यातील प्रत्येक ड्रोन चालकाची माहिती पोलीस कधी मागवणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. 


ड्रोन नियम उडवण्यासााठी काही नियम लागू करण्यात आले आहे. त्या नियमांचं उल्लंघन केल्यात गुन्हा दाखल होतो. उदा. नौदल, लष्कर आणि हवाई दलासाठी लागू नसतील. इतर सर्वांसाठी हे नियम लागू असतील. सर्व ड्रोन्सला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. तसेच, ड्रोनच्या उड्डाणाबाबत माहिती द्यावी लागेल.