Ajit Pawar On Sandipan Bhumre: हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून, यावेळी आज देखील सभागृह आरोप-प्रत्यारोपाने गाजला. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमीमध्ये (Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra) झालेल्या एका भ्रष्टाचाराच्या (Corruption) मुद्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना 'हो भ्रष्टाचार झालाच आहे' असे उत्तर भुमरे यांनी दिले. तर संबधित अधिकाऱ्यावर कारवाई देखील करण्यात आली असल्याचं भुमरे म्हणाले. 


अजित पवारांचा प्रश्न! 


सभागृहात प्रश्न उपस्थित करतांना अजित पवार म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये जो गैरव्यवहार झाला आहे, त्याचा स्वरूप नेमकं काय आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या-कोणत्या तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता. 


भुमरे यांचं उत्तर


अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात शौष खड्ड्याच्या कामात गैरव्यवहार झालेला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील दोन-चार तालुक्यात शौष खड्डे दाखवण्यात आले आहे. मात्र बीड जिल्ह्यात एका ठिकाणी बँकेत खाते खोलून त्याठिकाणी झालेल्या कामांच्या नावाने पैश्यांचा अपहार करण्यात आला असल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे. तर या सर्व प्रकरणी फेर चौकशी करण्यात येणार असल्याचं भुमरे म्हणाले आहे. तसेच यात जे दोषी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं भुमरे म्हणाले. तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी एसडी तायडे यांना देखील निलंबित करण्यात आले असल्याचं भुमरे म्हणाले. 


याचा संबध कुठपर्यंत? 


भुमरे यांच्या उत्तरावर बोलतांना अजित पवार पुन्हा म्हणाले की, भुमरे यांनी दिलेलं उत्तर भयानक आहे. उस्मानाबाद जिल्हा कुठे आणि बीड जिल्हा कुठे आहे. काम केले कुठे आणि पैसे काढले कुठे. यात कोणी एकटा दुकटा जबाबदार नसून, यात मोठा रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्याची देखील माहिती सभागृहाला देण्यात यावी. तसेच जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सोबतच हे कुठपर्यंत वर पोहचले आहे याची देखील माहिती द्या, असे अजित पवार म्हणाले. 


Ajit Pawar : 'पुण्यातील वाहतूक, पाणीप्रश्न, उद्योग, गृहसंस्थांच्या समस्यांवर तोडगा काढा', अजित पवारांची मागणी