पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची (Pune metro) बातमी आहे. पुणे मेट्रो आता सकाळी सहा वाजेपासून सुरु राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणेकर असलेल्या मेट्रो प्रवाशांनी सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सुरु करा अशी मागणी केली होती. त्यानुसार चांदणी चौकातील लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी अजित पवारांनी मेट्रो सहापासून सुरु करा, असं जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानुसार मेट्रो प्रशासनाने आता सात नाही तर सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 


पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. वेळापत्रकाचा बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार आहे. 


पुणे मेट्रोचं वेळापत्रक कसं असेल?


वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी 6 ते 8 - दर 15 मिनिटांनी 
सकाळी 8 ते 11 - दर 10मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10मिनिटांनी
रात्री 8 ते 10 - दर 15मिनिटांनी


पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग


सकाळी 7 ते 8 - दर 15 मिनिटांनी 
सकाळी 8 ते 11- दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 - दर 15 मिनिटांनी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण केलं. त्यानंतर पुणेकरांकडून या मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक पुणेकरांनी या मेर्टोत चक्क गर्दी केली होती. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास आता सोपा आणि वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे. सकाळी सहावाजेपासून मेट्रो सुरु करा म्हणजे अनेकांना या मेट्रोचा फायदा होईल, असं पुणेकरांचं म्हणणं होतं. हा प्रतिसाह पाहून आता मेट्रो सहावाजेपासून सुरु करण्यात आली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Metro : पक्के पुणेकर! शेवटी पुणेकरांनी मेट्रो हात दाखवून थांबवलीच; व्हिडीओ पाहून तुम्हीही ठेवाल डोक्यावर हात