Update : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाचा समारोप



Update : पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचा समारोप



Update : पुण्यात मराठा मोर्चात अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर कोंडी झाल्याने मराठा मोर्चा खंडुजीबाब चौकात थांबवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरु झाला, त्या डेक्कन परिसरात अजूनही काही लाखांची गर्दी पाहायला मिळते आहे.

VIDEO : मराठा मोर्चात अलोट गर्दी :



लक्ष्मी रोडवरही प्रचंड गर्दी असल्याने अप्पा बळवंत चौकातून गर्दी पुणे स्टेशनकडे वळवण्यात आलीय. विशेष म्हणजे मुख्य मोर्चा विधानभवन परिसरात पोहोचला आहे. तरीही अजून मोर्चा सुरु झालेल्या डेक्कन जिमखाना परिसरात लाखोंच्या संख्येत जनसागर दिसतो आहे.

VIDEO : काँग्रेसचे नेते पुण्यातील मराठा मोर्चात सहभागी



VIDEO : पुण्यातील मराठा मोर्चात शिवसेनेचे नेतेही सहभागी

Update : पुण्यातला मराठा मोर्चा सर्व विक्रम मोडण्याचा अंदाज



फोटो : पुण्यातील मराठा मोर्चात 'या' राजकीय नेत्यांचा सहभाग


फोटो : पुण्यात मराठा समाजाचा एल्गार


 

Update : मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ, पुण्यात भगवा जनसागर



Update : पुण्यातील मराठा मोर्चात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भाई जगताप, विश्वजित कदमही सहभागी



Update : पुण्यातील मराठा मोर्चाला अलोट गर्दी



Update : पुण्यातील मराठा मोर्चात शिवसेना नेत्यांचाही सहभाग



Update : पुण्यात मराठा मोर्चाला या राजकीय नेत्यांची उपस्थिती

  • अजित पवार

  • राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले

  • शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

  • शिवसेना खासदार श्रीरंग बारणे

  • राज्यमंत्री विजय शिवतारे

  • हर्षवर्धन पाटील

  • विश्वजीत कदम

  • भाई जगताप


 

Update : पुण्यात मराठा एकतेची वज्रमूठ, मोर्चासाठी राजकीय नेत्यांचीही लगबग



Update : पुण्यात मराठा मोर्चाला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थिती

Update : पुण्यातील मराठा मोर्चात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहभागी होणार



पुणे : नाशिकमधील विराट मोर्चानंतर आज पुण्यात मराठा समाजाचा मोर्चा आहे. या मोर्चासाठी पुण्यात जय्यत तयारी सुरु झाली आहे. डेक्कनमधील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चा निघणार आहे.

मोर्चासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांनी डेक्कनला गर्दी न करता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. या मोर्चात सुमारे पंधरा लाख लोक सहभागी होतील, असा दावा करण्यात येतो आहे.



राजकीय नेतेही हजेरी लावणार

नाशिकनंतर पुण्यातील मोर्चातही राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी होणार आहेत. तर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी केरळमधे आहेत. तेही पुण्यात दाखल होऊन मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. शिवसेनेचे खेडचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मंत्री विजय शिवतारे आणि इतर शिवसेना नेते एकत्रितपणे महर्षी शिंदे पुलापासून मोर्चात सहभागी होतील.

राजधानी दिल्लीतही मराठ्यांचा आवाज घुमणार

दरम्यान, लवकरच राजधानी दिल्लीतही मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे. त्याच्या नियोजनासाठी रविवारी बैठक होणार आहे. दिल्ली, गुडगाव, नोएडा याशिवाय उत्तर भारतातल्या मराठा समाज बांधवांना या मोर्चासाठी एकत्र करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले पण आता दिल्लीत स्थायिक झालेले प्रदीप पाटील या मोर्चाचे आयोजक आहेत.

मराठा मोर्चे कुठे कुठे निघाले?

औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट), बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर), हिंगोली (17 सप्टेंबर), नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), अकोला (19 सप्टेंबर), लातूर(19 सप्टेंबर), नवी मुंबई (21 सप्टेंबर) , सोलापूर (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर), नाशिक (24 सप्टेंबर).

आज कुठे कुठे मोर्चे आहेत?

पुणे, वाशिम, यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये आज मोर्चे निघणार आहेत.

मराठा मोर्चे कुठे निघणार?

बुलडाणा (26 सप्टेंबर), नंदुरबार (26 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), धुळे (28 सप्टेंबर), बारामती (29 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे.