Pune Patanjali News : पतंजलीच्या (patanjali yogpeeth) ऑनलाईन मीटिंगमध्ये एका व्यक्तीने पॉर्न व्हिडीओ (porn video) सुरु केल्याचा प्रकार घडला आहे. पतंजली योगपीठशी संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्राची एक ऑनलाईन मीटिंग सुरु होती. या बैठकीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पुण्याच्या येरवडा येथे असलेल्या एका कॉलेज कॅम्पसमध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या (Pune) तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देश-विदेशातील अनेक जण उपस्थित
आरोग्य संशोधन विभागाची बैठक असल्याने फक्त भारतातील नाही तर इतर देशातील मोठमोठे लोक या बैठकीत उपस्थित होते. बैठकीत आरोग्य, आयुर्वेद आणि पतंजलीच्या धोरणांबाबत चर्चा सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. देश विदेशातील अनेक डॉक्टर्स आणि संशोधकांच्या उपस्थितीत मीटिंग सुरु होती. त्याच मीटिंगमध्ये हा प्रकार घडल्याने मीटिंगमध्ये बाधा आली.
पोलिसांत तक्रार दाखल
या प्रकरणी पतंजलीचं योगपीठाचं मुख्य केंद्र असलेल्या हरिद्वारच्या बहादराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पतंजलीशी निगडित असलेल्या कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार दाखल केली आहे. हरिद्वार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या प्रकरणी योग्य कारवाई करु, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.
पतंजलीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मीटिंगमध्ये पतंजली योगपीठाशी संबंधित चर्चा होते. त्याच दरम्यान पॉर्न व्हिडीओ सुरु केला. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
मीटिंगमध्ये महिला देखील उपस्थित
पतंजली योगपीठात अनेक महिला डॉक्टर्स देखील कार्यरत आहे. शिवाय अनेक देशातील महिला डॉक्टर्स आयुर्वेदाचं संशोधन करण्यासाठी येत असतात. या मीटिंमधील संशोधकांमध्ये महिलांचा समावेश होता. त्यामुळे पुरुषांसोबतच समान संख्येत महिलांची उपस्थिती होती. त्यांच्यासमोरच हा व्हिडीओ प्ले झाला.
ऑनलाईन मीटिंगचे किस्से व्हायरल
ऑनलाईन मीटिंगचे अनेक किस्से आपण कायम ऐकतो अनेकदा ते किस्से व्हायरल होतात. कधी कोणाचा फोन वाजतो तर कधी कोणाकडे विचित्र काहीतरी घडत असतं. यापूर्वीदेखील असे अनेक किस्से घडले आहे. मीटिंगमध्ये अनेकदा पॉर्न व्हीडिओ प्ले झाले आहेत. या तरुणाने हा प्रकार जाणूनबुजून केला आहे की त्याच्याकडून अनावधनाने झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र त्यांच्या या कृत्यामुळे मीटिंगमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.