पुणे:  बालेवाडी क्रीडा संकुलाचे उपसंचालक माणिक ठोसरे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये माणिक ठोसरे यांनी क्रीडा खात्यात बदल्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या पैशांची चर्चा केली आहे.


यामधे माणिक ठोसरे यांनी सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून हव्या त्या ठिकाणी बदली हवी असेल तर 20 लाख रुपये द्यावे लागत असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमधील जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद रिक्त आहे याची चर्चाही त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर कोणाची बदली कुठे करायची याबद्दल आपण मंत्र्यांना सांगत असल्याचा दावा ठोसरे यांनी केला आहे. आपलं आत्ताच मंत्र्यांशी बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, या व्हिडीओत मी दिसत असलो, तरी त्यातील आवाज माझा नसल्याचा दावा माणिक ठोसरे यांनी केला आहे.

यापूर्वीही वाद

माणिक ठोसरे हे यापूर्वीही वादात होते. ठोसरे यांनी रविवारी जिम न उघडल्याने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता.