Beed News: धारदार शस्त्राचा धाक दाखवून पुणे (Pune) शहर आणि परिसरात दहशत माजविणारी कोयता गँगला (Koyata Gang) बीडमधील (Beed) केज पोलिसांनी ताब्यात घेतली असून या धाडसी करवाई बद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या सकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान ती कोयता गँग पुण्याची असल्याचं पुणे पोलिसांनी देखील स्पष्ट केलं आहे.
यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान या कोयता गँगवर पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पुणे पोलिसांनी बीड पोलिसांना दिली आहे. हे तिघेही जण पुण्यातील वेगवेगळ्या भागात राहतात. दरम्यान यावेळी केज पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी देखील जप्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवार 12 जुलै रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास केज बीड रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ ॲड. प्रदीप ईतापे आणि त्यांचे मित्र एकनाथ काळे यांना या तीन अनोळखी तरुणांनी अडवले. या तिघांनी त्यांना लातूरला जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. ॲड. प्रदीप ईतापे यांनी त्यांना काही सवाल विचारल्यानंतर या तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यातील एकाने त्यानंतर एकाने त्याचे कमरेचा कोयता काढुन ईतापे यांचे मित्र काळे याचे अंगावर उगारला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली.
या तिघांनी ते पुण्याच्या कोयता गँगचे असल्याचं देखील सांगितलं. त्याच वेळी खासगी कामासाठी गेलेल्या सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी नागरीकांच्या मदतीने त्या तिघांना ताब्यात घेतलं. दरम्यान ढाकणे यांनी तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्याब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक धारदार कोयता आणि एक दुचाकी ताब्यात घेतली. या तिघांवर केज पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'ती कोयता गँगच'
त्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर केज पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांच्याविषयी सांगितले. पुणे पोलिसांनी ही कोयता गँग असल्याचं सांगत त्यांनी पुणे शहर आणि परिसरात धारदार शस्त्र आणि कोयत्याची धाक दाखवल्याने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं. केज पोलिसांच्या या धाडसाते सधअया सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं देखील म्हटलं जात आहे.