पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आज जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या 30-31 मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे.
दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत होते. यातील काही मेसेजमध्ये तारखाही देण्यात आल्या होत्या. परंतु या निव्वळ अफवा असल्याचं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. बोर्ड सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
पिंपरीत बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरुणी बेपत्ता
बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवांचं पीक