मुंबई : हायटेक तेजस एक्सप्रेसमधील हेडफोनवर चोरट्यांनी डल्ला मारल्यानंतर, रेल्वेनेही साधे हेडफोन देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून रेल्वेच्या लुटमारीवर रेल्वेकडून हा उपाय योजल्याचं बोललं जात आहे.


गेल्या आठवड्यात हेयटेक तेजस एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर सुरु झाल्यानंतर, त्याच सर्वांनी कौतुक केलं. यावेळी तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात सिनेमा पाहण्यासाठी, किंवा गाणी ऐकण्यासाठी हेडफोन दिले होते. पण वापरण्यासाठी दिलेले हेडफोन्स परत करण्याचीही तसदी काही प्रवाशांनी घेतली नाही.

विशेष म्हणजे, यावेळी दोन एलईडी स्क्रीन्सचंही नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. बुधवारच्या प्रवासात अनेक प्रवाशांनी हेडफोन्स न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकारामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. त्यामुळे आता यावर रेल्वेनं साधे हेडफोन देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने तेजसमध्ये पुरवलेले हेडफोन्स 200 रुपये किमतीचे असून, यातील जळपास 300 हून अधिक हेडफोन चोरीला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे रेल्वेचे आणखी नुकसान टाळण्यासाठी आणि पुढील प्रवाशांना चांगली सुविधा पुरवण्यासाठी साधे हेडफोन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआरसीटीसीने 30 रुपये दराने 1 हजार नवे हेडफोन खरेदी केल्याचं समजतं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ही ट्रेन करमाळीहून मुंबईला येण्यासाठी निघाली, तेव्हा ट्रेनमध्ये अस्वच्छता असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. तसंच ट्रेनमधील टॉयलेट्स साफ न केल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली असं प्रवाशांचं म्हणणं होतं.

त्यापूर्वी समाजकंटकांनी तेजसच्या काचेवर दगडफेक केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे या नव्या एक्सप्रेसच्या सुरक्षेसाठी रेल्वेला कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या

तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला


गणपतीसाठी 'तेजस' फुल्ल, कोकणातील चाकरमानी वेटिंगवर


परतीच्या प्रवासात तेजस एक्स्प्रेसमध्ये घाणीचं साम्राज्य


अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल


हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट


केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा… हायटेक ‘तेजस’ सज्ज!


‘तेजस’वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या


मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!