Pune Crime News : पुण्यातील तरुण (pune News) एखाद्या गोष्टीसाठी काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. आईला गिफ्ट देण्यासाठी आणि प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी लढवलेली अशीच शक्कल पुण्यातील तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. (Pune Crime) प्रेयसीला आणि आईला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने थेट महागडी कार पळवून नेली. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला 24 तासात अटक केली आहे. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. इशांत शर्मा असं 25 वर्षीय कार चोरलेल्या मुलाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली होंडा कार विकत घेण्यासाठी गेला होता. मात्र याच बहाण्याने तरुणाने कार पळवून नेली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला त्यावेळी ईशांत एका ठिकाणी कार घेऊन उभा दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली मात्र त्यावेळी ईशांतने कबुली दिली नाही. मात्र पोलिसांनी दमदाटी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने कार चोरल्याची कबुली दिली. 


चोरीचं कारण ऐकून पोलिस


प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त आईला गिफ्ट देण्यासाठी त्याने ही कार चोरली होती. ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली कार पाहण्यासाठी तो गेला होता. कार पाहिल्यानंतर आवडली आणि मी विकत घेणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर व्यावहारही ठरवला. दोन दिवसांनी आईचा वाढदिवस असून तिला गिफ्ट द्यायची आहे. त्यामुळे दोन दिवसात कार घेऊन जातो असे त्याने सांगितले होते. 


आईला दाखवून आणतो सांगत...
सोमवारी दुपारी तीन वाजता तो नाना पेठेतील कबीर चौकात गाडी विकत घेण्यासाठी आला. गाडी आवडली आता आईला दाखवून आणतो असं सांगून तक्रारदाराच्या भावाबरोबर पुणे विद्यापीठात गेला. विद्यापीठात गेल्यानंतर आईला आणि प्रेयसीला गाडी दाखवून आणतो तुम्ही याच ठिकाणी थांबा असं सांगून गाडीतून भावाला उतरवलं. तक्रारदाराच्या भावाच्या हातावर तुरी देत त्याने कार पळवली. पोलिसांनी 24 तासात गाडीसह ईशांतल ताब्यात घेतलं आहे.  


पुणे पोलिसांची उत्तम कामगिरी
अनेक चोरीच्या तक्रारी पुणे पोलिसांकजे सातत्याने येतात. त्यामुळे अनेकदा अशा तक्रारींवर दुर्लक्ष केलं जातं. मात्र समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या चोरीची तक्रार गांभीर्याने घेतली आणि अवघ्या 24 तासात तपास करत चोराला अटक केली.