Pune Crime News: विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीने (Pune Crime News) संशय घेत तिच्यावर लोखंडी शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला 14 टाके पडले आहेत. पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक (Arrest) केली आहे.
घडलेल्या या प्रकरणी 30 वर्षीय पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती गणेश डिंबळे या 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही संपूर्ण घटना काल (13 फेब्रुवारी)ला संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर कुटुंबीयांनी पतीवर संताप व्यक्त केला आहे.
बारा वर्षापूर्वी झाला होता विवाह
दोघांचे बारा वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात वादावादी झाली होती. त्यामुळे ते दोघे विभक्त राहत राहतात. तक्रारदार या एका टॅव्हल्स कंपनीत कामाला आहेत. आरोपी गणेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्या वाद सुरू होते. सोमवारी सायंकाळी तो पत्नी काम करत असलेल्या परिसरात आला होता. त्यावेळी पत्नी ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत चहा पिण्यासाठी ऑफिस जवळील चौकात आल्या होत्या. हे सगळं पती गणेश यांनी पाहिलं. पत्नीसोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याला शिवीगाळ करुन पत्नीच्या मानेवर, डोक्यावर लोखंडी शस्त्राने वार केले. त्यावेळी संबंधित सहकाऱ्याने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी गणेश याने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली.
पत्नीनं पोलिसांत धाव घेतली...
या सगळ्या हल्ल्यात पत्नी जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यानंतर पत्नीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गणेश याच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुण्यात सध्या गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. पुण्यात रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. या गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक परिसरात भीतीचंदेखील वातावरण निर्माण झालं आहे. त्यात किरकोळ वादातून आणि संशयावरुन हल्ला केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वीचं भाई न म्हटल्याने दोन गट भिडले होते. त्यांनीदेखील परिसरात दहशत माजवण्याचं काम केलं होतं.