Pune Crime News :  पुण्यात उपचारासाठी आलेल्या (Pune) महिलेवर पिस्तुलाचा (Rape) धाक दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (crime news) आला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. वैद्यकीय उपचारासाठी भाड्याने राहावं लागणार असल्याने रुम भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना रुम दाखवण्याच्या बाहण्याने 52 वर्षीय व्यक्तीने सोसायटीमध्ये नेऊन महिलेवर बलात्कार केला.


या प्रकरणी 39 वर्षीय महिलेने या प्रकरणाची हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार 52 वर्षीय संजय बाजीराव भोसले याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पाच जानेवारीला हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही 39 वर्षीय महिला गाझियाबाद शहरातून पुण्यात मणक्याच्या उपचारासाठी आली होती. पुण्याजवळील उरळी कांचन परिसरात एका निसर्गोपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मणक्यावर उपचार सुरु असल्याने त्यांना अनेक दिवस त्यांना शहरात राहावं लागणार होतं. त्यामुळे त्यांनी रुम भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. 


पिस्तुल दाखवून केला बलात्कार


रुमसाठी संजय भोसले यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी संजय भोसलेने वेळेचा आणि महिला एकटी असल्याचा फायदा घेतला. रुम दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना जयप्रकाश सोसायटीमध्ये घेऊन गेला. त्यानंतर रुम दाखवली आणि रुममध्येच पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी महिला घाबरली. महिलेने हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंंवार महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि त्या महिलेवर बलात्कार केला. 


जीवे मारण्याची दिली धमकी


रुम दाखवण्याच्या बाहाण्याने सोसायटीत घेऊन गेला त्यानंतर महिलेला पिस्तुल दाखवत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर बघून घेईन, अशी धमकी संजय यांनी महिलेला दिली. 


पुण्यात अत्याचारात वाढ


पुण्यात महिलांच्या आणि मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर चार वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली होती. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला होता. या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती. अशा घटनांमुळे पुण्यातील महिलांच्या आणि मुलीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.