Pune crima News :  मार्केट यार्ड गोळीबार (Pune) प्रकरणात 7 जणांना अटक (Pune Crime) करण्यात आली आहे. पुण्यातील मार्केट यार्डातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करुन 28 लाख रुपयांची रोकड पळवली होती. त्याप्रकरणी सात जणांना पडकण्यात पोलिसांना यश आलं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर याआधी देखील विविध गुन्हे दाखल असून यातील आरोपी हे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते. अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयातून पैसे चोरुन न्यायचा कट देखील त्यांनी पूर्वनियोजित केला होता. हे बहुतांश आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून ते पुण्यातील मंगळवार पेठ, शिवाजीनगर, शिवणे याभागात राहायचे. यापैकी दोघांवर मोक्का दाखल आहे. मावळमधे हे आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुणे पोलिसांनी पाच पथकं तयार करुन 11 पैकी 7 आरोपींना जेरबंद देखील केल आहे. दरम्यान याच गुन्ह्यातील फरार चार आरोपीही लवकरच जेरबंद करु, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः या आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.


अंगडियावर दरोडा टाकला तरी ते पोलीसात जाणार नाहीत, असा विश्वास आरोपींनी होता म्हणून त्यांनी हा दरोडा रचला तसेच तिथे गोळीबार देखील केला होता सीसीटीवी कॅमेऱ्याच्या आधारे क्राईम ब्रँचने अवघ्या 48 तासात आरोपी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून 14 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.


48 तास तपास अन् सात जणांना बेड्या
शनिवारी (12 नोव्हेंबर) दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास पाच ते सहा आरोपी हे पी एम अंगडिया या कार्यालयात आले होते. हे कुरिअरचं कार्यालय असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि पैसे लुटून फरार झाले आहेत. तक्रारदार हे रोज प्रमाणे सकाळी अकराच्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम तपासली होती. काही वेळाने अचानक अज्ञात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले. आरोपींनी तक्रारदाराला बंदूक दाखवली. याचवेळी आरोपींनी तक्रारदाराला कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि पैसे घेऊन लंपास झाले होते. या सगळ्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. 48 तासात पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. मार्केट यार्ड परिसरात रोज भाजीपाल्यांची आवक असते. शेकडो व्यावसायिक या परिसरात माल खरेदीसाठी येत असतात. रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. अशा कायम वर्दळीच्या परिसरात गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं.