Smartana Patil Pune Crime : पुण्यातील गुन्हेगारी रोखणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. काही सक्रिय गॅंग आणि अन्य काही गुन्ह्यामुळे पुणे शहराची ओळख गुन्हेगारीचं शहर अशी होताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना आळा घालणं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मोहीम सध्या पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. यात परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी शहरातील विविध भागात गंभीर गुन्हे करणाऱ्या 12 कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


सूरज ताजमोहंमद सिद्दीक (वय 20, रा. गुलटेकडी), विवेक बाबुराव चोरगे (वय 23, रा. बालाजीनगर, धनकवडी), धीरज रंगनाथ आरडे (वय 25, रा. पद्मावती), गणेश सुनील मोरे (वय 26, रा. धनकवडी), किरण वामन जगताप (वय 25, रा. पद्मावती), तानाजी राजाभाऊ जाधव (वय 38, रा. संतोषनगर, कात्रज), प्रदीप रामा जाधव (वय 29, रा. जांभूळवाडी, कात्रज), गणेश विजय भंडलकर (वय 21, रा. कात्रज). ), आदित्य उर्फ ​​दिनेश युवराज ओव्हाळ (वय 22, रा. कोरेगाव पार्क), सागर कल्याण माने (वय 30, रा. कोरेगाव पार्क), अरबाज हसन कुरेशी (वय 23, रा. जाफरीन लेन, लष्कर), रोहन मल्लेश तुपधर (वय. 23, रा. ताडीवाला रोड) अशी पोलिसांनी शहरातून हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.


वेगवेगळ्या गुन्ह्यांची होती नोंद


पकडलेल्या गुन्हेगारांवर स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, लष्कर, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातून पसार होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्हेगारांवर खुनाचा प्रयत्न, आर्थिक फसवणूक, दरोडा, खंडणी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढील काळात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.


शहरात 2880 CCTV कॅमेरे बसवणार


पुणे पोलिसांनी शहरात 2880 नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालींवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. गेल्या दशकभरात घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन चोरी, दरोडे, मारामारी आणि अपघातांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा