Pune Crime news : पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 1 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 8 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि मौल्यवान दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यापूर्वीही त्यांनी पुणे आणि परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
वृद्ध आजीची काळजी घेणाऱ्या मदतनीस महिलेनेच केली चोरी, तब्बल साडेतीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला