Continues below advertisement

Nanded Crime: नांदेड येथील सक्षम ताटे (Saksham Tate) हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणात एक धक्कादायक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे इन्स्टाग्राम अकाउंट अद्यापही सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे “आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे सोशल मीडिया अकाउंट सुरू कसे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जातीयवादातून झालेल्या या हत्येमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र, अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे इन्स्टाग्राम अकाउंट अजूनही ‘लाइव्ह’ असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित अकाउंटचे नाव ‘हिमेश मामीडवार 302’ (हिम्या शूटर) असे असून, या अकाउंटवर आरोपीचे हातात बेड्या घातलेले आणि पोलिसांच्या हातात हात घातलेले फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

Nanded Crime: नांदेड जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनतोय का?

विशेष म्हणजे, या अकाउंटवरील प्रत्येक पोस्टवर भडक पंजाबी गाणी लावण्यात आली असून, कॅप्शनमध्येही आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर शब्दांचा वापर करण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, यामुळे पोलिस तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर “नांदेड जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनतोय का?” आणि “पोलिस यंत्रणा नेमकी कुठे आहे?” असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे सोशल मीडिया अकाउंट कसे सुरू राहू शकते, याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

Nanded Crime: शहरात तणावाचे वातावरण कायम

दरम्यान, या हत्याकांडानंतर नांदेड शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. सक्षम ताटेची प्रेयसी आंचल तसेच त्याच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. तर सक्षम ताटेच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींच्या सोशल मीडिया वापरावर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, तसेच या प्रकरणातील पुढील तपास कोणत्या दिशेने जातो? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Suhas Kande: मी मुलीचा बाप, तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या; विधानसभेत सुहास कांदेंनी गृहराज्यमंत्र्यांना धारेवर धरलं, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: मोठी बातमी! पुण्यातील व्यावसायिक नितीन गिलबिले हत्या प्रकरणात फरार माजी नगरसेवकावर ‘मकोका’, नेमकं प्रकरण काय?