Pune Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. अखेर या प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे. येत्या 12 ऑगस्टला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातुन जाणाऱ्या पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. 12 ऑगस्टला होणाऱ्या उद्घाटनची तयारी या ठिकाणी सुरु झाली आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
चांदणी चौकातील पुलाचं काम सुरु होऊन अनेक महिने झाले आहेत. चांदणी चोकातील वाहतुकीला अडथळा निर्माम होणारा पुल 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतरही अनेकदा वाहतुक कोंडी जैसे थेच होती. पुणे-बंगळुरु महामार्गावर या पुलामुळे वाहतुक कोंडी प्रचंड प्रमाणात व्हायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या वाहतुक कोंडीत सापडले होते. त्यानंतर त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली आणि त्यांनी चांदणी चौकातील पुल पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर याच ठिकाणी नवा प्रकल्पाचं काम सुरु होतं. हे काम पूर्ण झाल्याने या प्रकल्पाचं उद्घाटन 12 ऑगस्टला होणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :