Pune Accident : पुणे-बंगळुरु द्रुतगती मार्गावरील चांदणी चौकात (Chandani Chowk) अपघात (Accident) झाला आहे. खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पटली झाला. यावेळी चार प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करत होते. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चारही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सकाळच्या रहदारीच्यावेळी हा अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे-बंगळुरु द्रुतगती मार्गावरुन एक खासगी टेम्पो ट्रॅव्हलर कर्वेनगरकडून हिंजवडीच्या दिशेने जात होता. पुण्यातील चांदणी चौकात येताच टेम्पो ट्रॅव्हलरचा अचानक स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे चांदणी चौकात टेम्पो ट्रॅव्हलर पलटी. यावेळी वाहनात चार प्रवासी होते. प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान सध्या राज्यभरासह पुण्यात पाऊस सुरु आहेत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच द्रुतगती मार्गावर टेम्पो ट्रॅव्हरल पटली झाला. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती. सध्या टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावरुन बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टेम्पो ट्रॅव्हलरचे मोठे नुकसान झाले आहे.


Pune Accident : पावसामुळे रस्ते निसरडे


पुण्यात सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र काही प्रमाणात निर्माण झालं. त्यात रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. नागरिक सकाळच्या वेळी वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे अनेक परिसरात किरकोळ अपघात होतात. मात्र नागरिकांना वाहनं हळू चालवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि किरकोळ किंवा मोठे अपघात होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचंदेखील आवाहन करण्यात आलं आहे. 


Pune Accident : अपघातांना ब्रेक कधी?


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय राबवूनही अपघातांची संख्या वाढत असल्याने नेमका दोष कोणाचा? आणि अपघाताचं सत्र कधी थांबणार, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


हेही वाचा-


Pune Crime news : लेशपाल म्हणतो, 'तरुणीचा हल्ला अंगावर घेतला अन् रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो'