मुंबई : मोठ्या हिंमतीने शिक्षण घेतलेल्या पूजा मुंडे तिने वकिलीचे शिक्षण घेतले होते. न्यायाधीशाच्या परीक्षेत सुद्धा ती राज्यातून दहाव्या क्रमांकावर पास झाले होती. मात्र नियतीने न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसल्याचे स्वप्न माधुरी ठेवले विजेचा शॉक लागून पंचवीस वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि परळीवर शोककळा पसरली. परळी शहरातील मोंढा भागात राहणाऱ्या अॅड पुजा वसंत मुंडे यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. परीक्षा पास होवूनही कोरोनामुळे न्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांची मुलगी अॅड.पुजा मुंडे हे परळी शहरातील मोंढा परिसरामध्ये राहत होते. परळी शहरात जोरदार पाऊस पडत होता. यावेळी घरातील वरच्या मजल्यावरील रुमचे दरवाजे उघडे असल्यामुळे रुममध्ये पावसाचे पाणी साचलेले होते. पुजा हा दरवाजा बंद करण्यासाठी रुममध्ये जाताच विजेच्या बोर्डातून रुममध्ये करंट उतरलेला असल्याने शॉकचा धक्का बसून पुजाचे निधन झाले.
अॅड.पुजा मुंडे हीचे एल एल बी. एल. एल. एम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. एल.एल. एम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले यामध्ये विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच 2020 मध्ये न्यायाधीशची परीक्षाही पास झाली. या निकालात मुलींमधून राज्यात दुसरी, तर सर्वसाधारणमध्ये राज्यात दहावा क्रमांक पटकावला होता. एल.एल.बीमध्ये ही डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून दुसरा क्रमांक पटकावला होता. न्यायाधीशांची परीक्षा पास झाली होती मात्र कोरोनामुळे ही सगळी प्रक्रिया थांबल्याने पूजा घरीच होती.