जालन्यात गोळी झाडून PSIची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2016 08:20 AM (IST)
जालना: जालना तालुका पोलीस स्टेशनमधील पीएसआय प्रभाकर पठाडे यांनी गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमधून आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पीएसआय प्रभाकर पठाडे रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या नियंत्रण कक्षात ड्युटी करत होते. त्याचवेळी रात्री त्यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.