मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील आर्थिकचक्र थांबल्याने आर्थिक दुर्बल घटकांना मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पाच हजार कोटींहून जास्त पॅकेजची घोषणा मुख्मंत्र्यांनी केली आहे.  मात्र महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. 


कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक हे घटकही प्रभावित होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


ठाकरे सरकारच्या मदत पॅकेजमध्ये आणि पंतप्रधान मोदींच्या पॅकेजमध्ये काय फरक, काय साम्य? 


संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. 


इतर बातम्या