अहमदनगरमध्ये चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, संतप्त नागरिकांचा रास्तारोको
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 11:14 AM (IST)
अहमदनगर: अहमदनगरच्या कर्जत तालुक्याच्या भांडेवाडीत 10 रुपये देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे येथील संतप्त नागरिकांकडून बंद आणि रास्तारोको करण्यात आला आहे. कर्जत शहरात बंद पुकारुन नगर मार्गावर नागरिकांनी रास्ता रोको केला आहे. याप्रकरणी एसआयटीकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलानं १० रुपये देउन ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.