नागपुरात तरुणाच्या राहत्या घरी तरुण-तरुणीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 08:41 AM (IST)
नागपूर : नागपुरात एका तरुण आणि तरुणीने एकत्रित आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या राहत्या घरी दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. नागपूरमधील सावनेर तालुक्यातील मंगसा गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 26 वर्षीय विनोद गजभिये आणि 22 वर्षीय मोना बोरीकर यांनी गुरुवारी संध्याकाळी आत्महत्या केली. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. दोघांनी एकत्रित केलेल्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.