Priyanka Chaturvedi : गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं तर महात्मा म्हणायचं का?  आम्ही काय म्हणायचं आणि काय म्हणायचं नाही हे महाराष्ट्राच्या लोकांना सांगायची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा तोफ डागली आहे. श्रीकांत शिंदेंच्या माथ्यावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार है या टीकेवरून शिवसेनेच्या दोन्ही गटातील महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही बाजूने हल्लाबोल सुरु असतानाच चतुर्वेदी यांनी पुन्हा टीका केली आहे.


महाविकास आघाडीची भाईंदर पूर्वमध्ये नवघर मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल केला. राजन विचारे यांना एवढ्या मोठ्या मताने विजयी करायचं की, आपण ईव्हीएमचे बटण दाबताच त्याचा आवाज थेट दिल्ली आणि गुजरातपर्यंत गेला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 



गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं तर महात्मा म्हणायचं का? 


या सभेतही बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे गटाला टार्गेट केले. प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, मी केलेलं विधान व्हायरलं झाल्याने मला प्रश्न पडला की, गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं तर महात्मा म्हणायचं का? असा सवाल करत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली. 


मोदींची मिमिक्री करत केली टीका 


प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींची मिमिकी करत शिंदे गटावर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, मित्रो क्या ये सही है? गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं हे आपल्याला मंजूर आहे का? गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं हे महाराष्ट्रातील जनतेला मंजूर नाही. कोणाला काय म्हणायचं हे महत्वाचं नाही. मात्र, गद्दारांना गद्दार म्हणणारच. जो कलंक त्यांनी लावला तो सात पिढ्यांना भोगावा लागेल. त्यामुळे आता आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. 


इतर महत्वाच्या बातम्या