Prithviraj Chavan: नथुराम गोडसेनं गोळी मारताना धर्म बदललं होता का? दहशतवादी हा गुन्हेगार आहे, मारेकरी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर आरोपी सापडले नाहीत, ट्रेन ब्लास्टमध्ये पुरावे सापडले नाहीत म्हणून मुक्त सोडलं. मालेगावमध्येही तेच झालं. गृहमंत्र्यांनी पुरावे सादर केलेलं नाही. आज एका मागोमाग एक आरोपी सुटत असतील तर गृहमंत्री यांच्या यंत्रणाचं अपयश असल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आज हे नाहीत, तर दुसरं कोणीतरी असेल. आरडीएक्स बाजारात मिळत नाही. महाराष्ट्र पोलिसांनी हा खटला आधी सादर केला होता. महाराष्ट्र पोलीस सक्षम नाही का? खोट्या केसेस रचल्या का? ज्यांनी खटला भरला त्यांच्यावर कारवाई करा, हल्ला कोणीच केला नाही का? साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील निर्णय देखील चुकीचा असून पुरावे सादर झाले नाहीत हे अपयश आहे सरकारचं असल्याची टीका त्यांनी केली.
निकाल कसा लागणार आहे याची माहिती होती
मालेगाव निकालावर बोलताना ते म्हणाले की, घटना 2008 ची आहे आणि आता अनेक वर्ष झाली खटला चालला. त्या घटनेत कोणीतरी स्फोट केला. स्फोट आपोआप झाला नसून एका मशीदीच्या शेजारी हा स्फोट झाला. निकाल कसा लागणार आहे या सगळ्या प्रकरणाचा याची खात्री होती. ज्या दिशेने तपास चालला त्यामध्ये काही होईल असं वाटलं नव्हतं. न्यायालयाने आपल्या निकालात तेच म्हटल आहे की एनआयएनं पुरावे दिले नसल्यानं सोडलं. जर यांनी बॉम्ब फोडला नाही, तर कोणी केला, हा कट कोणी केला हे सांगत नसल्याचे ते म्हणाले.
तोपर्यंत असे निकाल अपेक्षित
एनआयए अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातही घटना कोणीच दोषी नाही. जी माणसं मेली आणि जखमी झाली त्यांना काय सांगणार? अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो पर्यंत या यंत्रणा काम करतात तोपर्यंत असे निकाल अपेक्षित आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भगवा शब्द वापरू नका. भगवा आमच्यासाठी एक राष्ट्रभक्तीचा रंग आहे. ज्ञानेश्वरांचा हा भगवा आहे. दहशतवादाचा जात धर्म नसतो. तो गुन्हेगार असतो निरपराध लोकांचा खून करत असतो.
मृत्युमुखी पडले त्यांना काय सांगणार?
त्यांनी पुढे सांगितले की, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे होता. भाजपने एका जाती धर्मात गुंतवून ठेवलं आहे. आज उत्सवासारखा दिवस साजरा करत आहेत, पण जे मृत्युमुखी पडले त्यांना काय सांगणार? हे एनआएचं हे अपयश आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हे काम करतात. आरोपींना शिक्षा झाली नाही कारण एनआयएनं पुरावा सादर केला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या माफीचा काय प्रश्न आहे, मुख्यमंत्री काहीही म्हणतील असे ते म्हणाले.