पुणे : ‘मध्यावधी निवडणुकांची मला फार शक्यता वाटत नाही. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असं वाटत नाही. शिवसेनेची लोकं मंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. त्यांना लाल दिव्याच्या गाडीची सवय झाली आहे. त्यामुळे ते आता विरोधी पक्षात बसतील असं वाटत नाही.’ असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.


'राजीनामे खिशात ठेवायची गरज नाही, उद्धव ठाकरेंची घोषणा पुरेशी'

‘राजीनामे द्यायचे असतील तर ते खिशात ठेवण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा काढून घेतो एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. त्यामुळे शिवसेना सध्या तरी सत्तेत बाहेर पडेल असं मला वाटत नाही.’ असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

'शिवसेनेच्या मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाडीची सवय, ते सत्ता सोडणार नाही'

'शिवसेनेची लोकं मंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. त्यांना लाल दिव्याच्या गाडीची सवय झाली आहे. त्यामुळे ते आता विरोधी पक्षात बसतील असं वाटत नाही.' अशी बोचरी   टीकाही चव्हाणांनी केली.

शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतला तरीही भाजप अल्पमतातील सरकार चालवेल. त्यामुळे शिवसेनेला अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल. असं अंदाज पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला.

शिवसेना जर सत्तेतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. असंही चव्हाण म्हणाले.

VIDEO:



संंबंधित बातम्या:

‘हा माझा शब्द आहे’, भाजपचं मुंबईत नवं कॅम्पेन

निवडणुकीनंतरही सरकारला कोणताही धोका नाही : चंद्रकांत पाटील

फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना

वेळ पडल्यास निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंचे संकेत