पंधरा दिवसांपूर्वी कुपवाडमध्ये संदीप सुर्वेच्या त्रासाला आणि एकतर्फी प्रेमाला कंटाळून एका युवतीसह तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.
संदीपवर खंडणी, मारामारी, बाललैंगिक अत्याचार यासारखे तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहाटे चारच्या सुमारास बरॅकमध्येच त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी संदीप सुर्वे आणि एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. मात्र संदीपची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहून तिने अचानक लग्नास नकार दिला.
घरच्यांनी तिच्यावर बळजबरी करत नकार देण्यास भाग पाडल्याचा आरोप संदीपने केला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांना बोलावून त्यांची समजूत काढली. पण त्यानंतरही आरोपीनं मुलीला अश्लिल मेसेज पाठवले.
मेसेजमुळे त्रस्त झालेल्या मुलीनं आणि तिच्या वडिलांनी थेट कुपवाड पोलिस ठाण्यातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला, त्यानंतर पोलिसांनी आरोपी संदीपला अटक केली होती.