औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असताना पत्रकारिता विभागाचा उद्याचा एक पेपर एक दिवसाने पुढे ढकलला आहे.


विशेष म्हणजे मागच्या वर्षीही परीक्षा केंद्रावर असाच गोंधळ झाला होता. दिवाळीच्या दोन दिवस अगोदर म्हणजे 27 तारखेलाही पेपर ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये अगोदरच नारजी होती. पण आता तर 24 तासांपेक्षाही कमी वेळ असताना नवी तारीख दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मागच्या वर्षी पेपरला एक दिवस बाकी असताना परीक्षा केंद्र बदललं होतं. परिणामी विद्यार्थ्यांना पेपरच्या दिवशी नव्या परीक्षा केंद्रावर पोहचायला उशीर झाला.

तर 2014 साली जागा अपुरी असणारी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे एमएच्या विद्यार्थ्यांना खाली बसून पेपर द्यावा लागला होता.