अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण, आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला


मुंबई: ध्वनीप्रदूषणाबाबत अनेक तक्रारी येऊनही कारवाई का नाही?, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

पंढरपूर : चंद्रभागा नदीत शहर हद्दीतील पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 30 बोटी प्रशासनाने फोडल्या, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुखांची कारवाई

पुणे : पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास भाजप वगळता सर्वपक्षीयांचा विरोध, फडणवीसांविरोधात सेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसची निदर्शनं

पुणे : तळेगाव-चाकण रस्त्यावर कॉटन कंपनीला मोठी आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार-खासदारांची आज मातोश्रीवर बैठक, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा

नवी दिल्ली : 'ऐ दिल है मुश्किल'चा दिग्दर्शक करण जोहर, प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार

नाशिक : ग्रामपंचायत सदस्य बाळू खोडके मृत्यू प्रकरण, दोघा पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

औरंगाबाद: शेंद्रा येथील दोन कंपन्यांना आग, सध्या आग अटोक्यात मात्र कंपन्यांचं मोठं नुकसान


सांगली: कुपवाड एमआयडीसीमधल्या प्लायवूड कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सांगली : मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या, कैदी संदीप सुर्वेचा चादरीने गळफास

मुंबई : कालिनातील आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र विरा हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाकडून हत्येची कबुली

हेडलाईन्स :

1. पुण्यातल्या जीएमआरटीने टिपला मंगळावरचा संदेश, युरोपच्या मंगळ मोहिमेला भारतीय शास्त्रज्ञांची साथ

2. ऐन दिवाळीत चणाडाळ 70 रुपये किलोनं विकणार, गिरीश बापट यांचं ग्राहकांना गिफ्ट, साठेबाजांवरही धडक कारवाई

3. काळवीट शिकार प्रकरणी सलमाननं आत्मसमर्पण करुन तुरुंगात जावं, राजस्थान सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका, सलमानच्या अडचणीत भर

4. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर दगडफेक, असनसोल मतदार संघातील प्रकार, तृणमुलच्या कार्यकर्त्यांवर आरोप

5. मराठा समाजाला कुणबी किंवा ओबीसी म्हणून आरक्षण नको, चंद्रपूरच्या मोर्चात कुणबी समाजाची मागणी, आरक्षण वादाची नवी नांदी

6. सुपरफास्ट मुंबई मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग मोकळा, मेट्रो सहाचंही विस्तारीकरण

7. मनसेच्या 12 मनसैनिकांची दिवाळी तुरुंगात, कार्निवल सिनेमासमोर आंदोलन केल्यानं न्यायालयीन कोठडी, कार्यकर्त्यांची धरपकड

8. भारत विरुद्ध न्युझीलंड दुसरी वनडे आज, दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर रंगणार सामना मालिकेत भारताला 1-0 ने आघाडी