Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानिक जैन धर्मशाळेत एका पुजाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयूर कुमार महेशभाई राठवा, वय 23 राहणार वालपरी, तालुका बारडोली, जिल्हा छोटे उदयपूर (राजस्थान) असा मृत व्यक्तीची माहिती समोर आली आहे. तो दहा दिवसांपूर्वी रायगडमधील नागोठणे जैन मंदिरात कामानिमित्त आला होता.
घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला
धर्मशाळेच्या तिसऱ्या मजल्यावर फॅनला दोरी बांधून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल समोर आलाय. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात हलवला. या प्रकरणाचा पुढील तपास DYSP प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करत आहेत.
मुंबईतील पवई तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
मुंबईतील पवई तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुडतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत. पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाची ओळख पाठवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तरुणाच्या हातावर सोमनाथ नावाचा टॅटू आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सोमनाथ दीक्षित असं त्याच नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तलावातून बाहेर काढला असून राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत केले घोषीत केले. बुडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
बीड जिल्ह्यात बंजारा समाजातील तरुणाने संपवलं जीवन
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पांगरी गावात बंजारा समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्रवीण जाधव काही काळापासून सक्रिय होता. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावं, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र, या मागणीवर शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. अखेर आज त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीणने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत त्याने आपल्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि प्रवीणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावं, याकरिता आतापर्यंत स्थापन केलेले आयोग ही सकारात्मक होते. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती. त्यानुसार आता बंजारा समाज ही मागणी करू लागला आहे.
महत्वाच्या बातम्या: