Bacchu Kadu :  बारा तास नाही तर बारा महिने थांबावे लागले तरी परत जाणार नाही.  उद्या बारा वाजेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विमान वाहतूक आणि शेजारुन जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवू असा इशारा प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी दिला आहे. आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे. दडून बसलेल्या फडणवीसांना बाहेर यावेच लागेल आणि सात बारा कोरा करावा लागेल असे बच्चू कडू म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. 

Continues below advertisement

माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तसेच इतर मागण्यांसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांचा मोर्चा सध्या नागपुरात पोहोचला आहे. कर्जमाफी करण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

आपण तिथे जायचे नाही, तर सरकारला इथे बोलवायचे 

काल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गेम होता की मुंबईला बोलावून गेम करणार होते. आपण तिथे जायचे नाही, तर सरकारला इथे बोलवायचे असे मत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केले. पैसे खिशात नसताना शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. बायकांचे मंगळसूत्र मोडले आणि इथे आल्याचे बच्चू कडू म्हणाले. लढाई सोपी नाही. आले आणि गेले एवढी सोपी ही लढाई नाही असे कडू म्हणाले. 

Continues below advertisement

सर्व पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांची अडचण

सरकारच्या डोक्यात असे आहे की आपण मोर्चा हाणून पाडू. फक्त कापूस शेतकऱ्यांची अडचण नाही, तर सर्व पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांची अडचण आहे. आंदोलन उभे राहणे कठीण असते. एकदा आंदोलन थांबले तर पुढे पुन्हा उभे करणे कठीण असते असे बच्चू कडू म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीची तिकीट मिळाली आणि गावाकडे परतले असे होऊ नये. आज जेवढी संख्या आहे, उद्या यापेक्षा चौपट संख्या असली पाहिजे असे बच्चू कडू म्हणाले. 

आता मागे हटायचे नाही 

शक्तीपीठ महामार्ग का करायचाय? मुंबईत एवढे हजारो कोटी खर्च करायची गरज का? मुंबईचे स्वतःचे एवढे बजेट असताना आणखी खर्च का? असे सवाल बच्चू कडू यांनी केले. आणखी किती दिवस सहान करायचे. आता मागे हटायचे नाही असे बच्चू कडू म्हणाले. तुम्हाला त्रास होईल. जेवण पाण्याची अडचण होईल. मात्र ही लढाई एका दिवसाच्या जेवणाची नाही तर आयुष्यभराच्या जेवणाची लढाई आहे. गावाला परत जाऊ नका. एक गेल्याने काय होते असे विचार करुन परत जाऊ नका असे बच्चू कडू म्हणाले. 

फडणवीसांना सात बारा कोरा करावा लागेल

तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने याल अशी अपेक्षा नव्हती, मात्र तुम्ही स्वखर्चाने आले. चारही दिशांनी आले. तुमच्या प्रयत्नांना माझा सलाम असल्याचे कडू म्हणाले. तुम्हाला इथे थांबल्यावर झोपण्यासाठी मागे जावे लागेल, बाजूला बगीचा आहे, मंगल कार्यालय आहे, ते ताब्यात घेऊ. दार तोडावे लागले तर तोडून टाकू. ताब्यात घेऊ ते आपलेच आहे असे बच्चू कडू म्हणाले. आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे. दडून बसलेला फडणवीसांना यावेच लागेल आणि सात बारा कोरा करावा लागेल असे बच्चू कडू म्हणाले.  

गरज भासली तर विमान वाहतूक आणि शेजारुन जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवू 

काँग्रेस ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. उद्या आपल्या गावात फोन करा, उद्या जर संपूर्ण महाराष्ट्र जाम करावा लागला तर प्रत्येक रस्ता जाम केला पाहिजे असे बच्चू कडू म्हणाले. आता हैदराबाद मार्ग जाम झाला आहे. जबलपूर मार्ग जाम झाला आहे. उद्या बारा वाजेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर गरज भासली तर विमान वाहतूक आणि शेजारुन जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवू असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही रेल्वे रुळच राहू देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला. 

भाजपला दया नाही आली तर RSS ला दया येईल

देवा भाऊच्या घरी जाण्याचे  कार्यक्रम आपण आज टाळले आहे. उद्या 12 वाजता थेट रेल्वे थांबवू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. पंजाब दिल्लीच्या धर्तीवर आंदोलन होईल. कितीही दिवस लागले तरी चालतील असे कडू म्हणाले. सर्व आंदोलने मुंबईत का करावी? नागपुरात आमचे देवा भाऊ आहेl, नितीन भाऊ आहेत, RSS आहे. भाजपला दया नाही आली तर RSS ला दया येईल असे बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Bacchu Kadu : आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंनी ओढले टीकेचे आसूड