Continues below advertisement

Maharashtra IAS Transfer : प्रशासनातील वरिष्ठ स्तरावरील खांदेपालट सुरूच असून नुकतेच राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे (Sanjay Khandare IAS) यांची बदली पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागात करण्यात आली आहे. तर सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव परराग जैन नैनुतिया (Parrag Jaiin Nainutia IAS) यांची बदली पाणीपुरवठा विभागात करण्यात आली आहे.

तीन आठवड्यापूर्वीही राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कुणाल कुमार (Kunal Kumar IAS) यांच्याकडे शिवशाही पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पवनीत कौर (Pavneet Kaur IAS) यांना पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

1. संजय खंदारे (Sanjay Khandare IAS :RR:1996) प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. परराग जैन नैनुतिया (Parrag Jaiin Nainutia IAS :RR:1996) प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. कुणाल कुमार (Kunal Kumar IAS :RR:1999) यांना शिवशाही पुनर्वासन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. वीरेंद्र सिंह (Virendra Singh IAS :RR:2006) सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. ई. रावेंदिरन (E.Ravendiran IAS:RR:2008) मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. एम.जे. प्रदीप चंद्रन (M.J.Pradeep Chandran IAS :RR:2012) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. पवनीत कौर (Pavneet Kaur IAS :RR:2014) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: