नांदेड : नांदेड जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने नांदेड जिल्‍ह्यातील कोविड रुग्‍णांची स्थिती लक्षात घेऊन सोमवार 28 जून 2021 पासून सुरु करावयाच्‍या विविध सेवा, आस्‍थापना व त्‍यांच्‍या वेळा निश्चित करण्‍याबाबत निर्णय घेतला आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश जारी केले आहेत. राज्‍यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्‍या डेल्‍टा प्‍लस विषाणूने बाधीत रुग्‍ण आढळून येत आहेत. याच्या संक्रमणाचा दर जास्‍त असल्‍यामुळे त्यात होणारे बदल आणि त्‍यापासून होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍याच्यादृष्‍टीने राज्‍यातील सर्वच जिल्‍ह्यामध्‍ये स्‍तर-3 मधील तरतूदीनुसार सुरु करावयाच्‍या आस्‍थापना बाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्‍वये प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाय योजना करणे आवश्‍यक आहेत त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नूसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात सोमवार 28 जून 2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा दुपारी 4 वाजेपर्यंत असतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत (शनिवार व रविवार वगळून) असेल. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह पुर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील तर सायं. 4 नंतर पार्सल सेवा सुरु राहील. शनिवार व रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील. 

जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व एकूण कामगाराच्‍या 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. कामगारांची Transport bubble द्वारेच ने-आण करण्‍याची जबाबदारी संबंधित आस्‍थापना प्रमुख यांची राहिल, त्‍याशिवाय सदर उद्योग, व्‍यवसाय चालू करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे, आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. अत्यावश्यक सेवा- रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्‍सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांनाआवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणवितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचादेखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क,वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यकारी कच्चा माल उद्योग आणि अनुषंगिकसेवा यांचे उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल. या निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander जिल्हाधिकारी व  तहसिलदार यांची राहील. निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील. या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 28 जून 2021 चे सकाळी 7 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. परंतू कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्‍कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक करण्‍याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक नांदेड, नांदेड वाघाळा महानगरपालीका आयुक्‍त, सर्व नगर परीषद, नगरपंचायत मुख्‍याधिकारी यांचे वर राहील असं या आदेशात सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या :