त्यामुळे शिर्डीत आज कडेकोठ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरुवातीला शिर्डी ते मुंबईबरोबरच दिल्ली, भोपाळ अशा अनेक शहरांपर्यंत विमानसेवा नियोजित होत्या. मात्र तूर्तास शिर्डी-मुंबई सेवा सुरु करुन इतर सेवा विचाराधीन आहेत.
लागून आलेल्या सुट्ट्या आणि विजयादशमीचा मुहूर्त साधून हजारो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावं म्हणून साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं.
भाविकांनी गर्दी केली असली तरी राष्ट्रपती शिर्डीत येत असल्यामुळे साई दर्शन आणि आरतीचे पास काही वेळ बंद करण्यात आले. सकाळी 9 ते 11 या वेळेत भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार नाही. दोन तास मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला.