पुणे : सारसबागेसमोर असलेल्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. शुद्ध सोन्यात बनवलेली तब्बल १६ किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी देवीला ही साडी नेसविण्यात येते. दक्षिण भारतातील कारागिरांनी ८ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे नववे वर्ष आहे. सुवर्णवस्त्रातील देवीचे हे मोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज दसऱ्यानिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. दसऱ्यानिमित्त घरोघरी शस्त्र, लक्ष्मी आणि घरातील वाहनांची पूजा केली जाते. झेंडूची फुले, आंबा आणि आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे कराराचा प्रारंभ केला जातो.
पुण्यातील महालक्ष्मीला १६ किलो सोन्याची साडी अर्पण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2019 12:01 PM (IST)
सारसबागेसमोर असलेल्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. शुद्ध सोन्यात बनवलेली तब्बल १६ किलो वजनाची ही साडी आहे. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -