Pen Drive Case :  प्रवीण चव्हाण (Pravin Chavan Case) पेनड्राईव्ह प्रकरणातील मोठं अपडेट समोर आलं आहे. राज्य विधानसभेचे (Maharashtra Vidhansabha) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.  लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत. 


राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकार रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले होते. 


प्रवीण चव्हाण Sting Operation केसचा तपास राज्य सरकारनं सीआयडीकडे देत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ही केस CBI कडे न दिल्याने भाजप आक्रमक झाली होती. विधानसभेत BJP कडून  सभात्याग करण्यात आला होता. 


देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?


देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करताना म्हटलं होतं की, राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


 





 





 



संबंधित बातम्या