मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांनी बाजी मारली. अभिनेते गिरीश ओक यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 2018 ते 2023 या कार्यकाळासाठी ही निवड आहे. e प्रसाद कांबळींसह शरद पोंक्षे यांची प्रमुख कार्यवाहपदी तर नाथा चितळे यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. नाट्यसंमेलनाला प्राधान्य देणार आहे. कारण आधीच उशीर झाला आहे. गाव निश्चित करुन नाट्यसंमेलनाची तयारी सुरु करु, अशी पहिली प्रतिक्रिया प्रसाद कांबळी यांनी एबीपी माझाशी व्यक्त केली. अशी असेल नवी कार्यकारिणी :   अध्यक्ष - प्रसाद कांबळी   उपाध्यक्ष प्रशासन ओक गिरीश   प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे कोषाध्यक्ष नाथा चितळे उपाध्यक्ष उपक्रम नरेश गाडेकर   सहकार्यवाह ढगे सुनील ढेरे अशोक लोटके सतीश कार्यकारी समिती वेलणकर मधुरा रेगे शंकर जाधव भरत नारकर अविनाश बेंद्रे शेखर भिसे राजन कदम मंगेश जंगम संदीप खरवस आनंद देशमुख उज्ज्वल महाजन गिरीश