पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे हे एका मराठी चित्रपटाच्या मूहुर्तानिमित्त कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मुस्लीम आरक्षण आणि सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय. इतकेच नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या तोंडावर सर्व रिपब्लीकन पक्षांना एकत्रीत आणून निवडणूका लढण्याचा विचार सुरु असल्याचही त्यांनी म्हटलंय. मात्र, प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन नाही. त्यांच्या सोबत कोणताही चर्चा नाही अशीही टिका त्यांनी केलीय. 


कल्याणमध्ये सम्राट नावाच्या एक मराठी चित्रपट तयार केला जाणार आहे. या चित्रपटाच्या मूर्हूतानिमित्त पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे हे कल्याणमध्ये आले होते. या चित्रपटासाठी ऑडीशन सुरु होणार आहे. कलाकारांनी ऑडीशन द्यावे. मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे , असे आवाहन प्रा. कवाडे यांनी केलंय. 


इम्पीरीयल डाटा तयार झाल्यावर ओबीसीचा प्रश्न सूटू शकतो
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आमच्या पक्षाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे इम्पीरिअल डाटा मागितला आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. इम्पीरिअल डाडा गोळा करण्याच्या कामाकरीता राज्य सराकरने 435 कोटी रुपयांची तरतूद केलीय. येत्या तीन महिन्यात हा डाटा गोळा करुन न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रश्न सुटू शकतो.


मुस्लीम आरक्षणावर कवाडे यांची प्रतिक्रिया
राज्यातील अल्पसंख्याक समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळायला हवे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सूचना केलीय. मात्र, सरकारनं याकडं का लक्ष देत नाही? असा आश्चर्याचा विषय आहे. शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या मुस्लीम समाजाला शिक्षणात तरी पाच टक्के आरक्षण कायम ठेवले जावे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे.


ब्राह्मण आरक्षणावर प्रा. कवाडे काय म्हणाले? 
ब्राह्मण हा समाज पूर्वीच आरक्षीत आहे. शासन असो की प्रशासन त्यात ब्राह्मण समाज आहे. पूर्वापासून प्रत्येक राजवटीत त्यांनाच फायदा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षणाची मागणी करुन आरक्षणाची चेष्टा करुन नये असा सल्ला आरक्षण मागणाऱ्या ब्राह्मण संघटनांना प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिलाय.


आज कालच्या राजकारण्यांच्या टिकेवर प्रा. कवाडे यांची प्रतिक्रिया
राजकारणात शत्रूत्व निर्माण होणार नाही. लोकशाहीच्या सभ्येताला नेत्यांनी मंत्र्यांनी वागले पाहिजे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. अनेक प्रकारचे विरोध सहन करुन आमचा पक्ष काम करीत आहे. काल परवा म्यॉव- म्यॉव झाले, पंतप्रधानांवर टिका केलीय. टिका करा पण पातळी आहे. ती पातळी ढासळू नये. असभ्यतेनं वागून कमरेखालचं राजकीय टिका नको असा सल्ला टिकाकारांना प्रा. कवाडे यांनी दिलाय.


प्रकाश आंबेडकरांवर जोंगेद्र कवाडे यांची टिका
प्रकाश आंबेडेकर हे रिपब्लीकन नाही ते स्वत:ला रिपब्लीकन मानत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत रिपब्लीकन ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी सर्व रिपब्लीकन गटांनी एकत्रित येऊन निवडणूका लढल्या पाहिजेत. आमच्याकडून प्रयत्न सुरु आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे की नाही असा सवाल कवाडे यांना विचारला असता प्रकाश आंबेडेकर हे रिपब्लीकन नाही ते स्वत:ला रिपब्लीकन मानत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत रिपब्लीकन ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही. रामदास आठवले यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांसोबत आमची ऐक्याची चर्चा सुरु आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha