परभणी : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित विकास आघाडीचे चार उमेदवार जाहीर केले आहेत. प्रकाश आंबेडकर काल परभणीत सत्ता संपादन सभेच घोषित केले. माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी जी कोळसे-पाटील यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे मराठवाड्यातील नांदेड, लातूरनंतर इतर चार जिल्ह्याचे हे उमेदवार आहेत. औरंगाबादमधून बी जी कोळसे-पाटील, बीडमधून प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबादमधून अर्जुन सलगर, जालन्यातून डॉ. शरद वानखेडे यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
मराठवाड्यातील राहिलेल्या परभणी आणि हिंगोलीचे उमेदवार येत्या 23 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितलं.
याआधी वंचित बहुजन विकास आघाडीनं लोकसभेसाठी जाहीर काही उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बुलडाण्यातून आमदार बळीराम सिरस्कार, अमरावतीतून गुणवंत देवपारे, नांदेडमधून प्रा. यशपाल भिंगे, यवतमाळ-वाशीममधून प्रा. प्रविण पवार, माढा येथून अॅड. विजय मोरे यांना उमेदवारी घोषित केली आहे.