औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एसएफआय यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आधी पुण्यात सुरु असलेला या दोन विद्यार्थी संघटनांमधील वाद आता औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोहोचला आहे.
पुण्यातील विद्यार्थी संघटनांचा वाद सुरु असतानाच औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनामध्ये पोस्टरवॉर सुरु झालं आहे. अभाविप आणि एसएफआय या विद्यार्थी संघटनांनी एकमेकांना पोस्टरद्वारे प्रश्न विचारले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय यांच्यामधील पोस्टरवॉरची जोरदार चर्चा सुरु आहे.