बीड : सध्या आपल्याकडे जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची आकडे समोर येत आहेत. मात्र, याहीपेक्षा धक्कादायक माहिती आता आयसीएमआर (ICMR) सर्व्हेक्षणामधून समोर आली आहे. बीड जिल्ह्यातून एकूण 396 वेगवेगळ्या ठिकाणाहून सँम्पल तपासणीसाठी नेले होते. त्यातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आता पुढे आले आहे. याचाच अर्थ बीड जिल्ह्यातील एकूण सरासरी या सँम्पलचा एव्हरेज रेट हा 1.01% टक्के आहे.


या संशोधन अहवालानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या असल्या तरी काही दिलासादायक गोष्टी घडत असताना पाहायला मिळत आहेत. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ज्या व्यक्तींचे सँम्पल घेण्यात आले होते त्या व्यक्तींना कोणताही त्रास नव्हता. अथवा यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. कोणताही उपचार न घेता रुग्णालयात न जाताही बरे झाले होते. म्हणजेच कोरोनाची आणवश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.


बीडमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल 


बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून 21 मे ला सुमारे 396 सॅम्पल घेतले होते. विशेष म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींमधून हे सँम्पल घेण्यात आले होते. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. मात्र, यात सँम्पलमधून चारजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आता समोर आले आहे. यावरुन आता बीड जिल्ह्यातील अनवेटेड प्रेव्हेलन्स अर्थात संभाव्य संसर्ग 1.01% म्हणजे सुमारे 28 हजार रुग्ण इतका असल्याचा निष्कर्ष आयसीएमआरने काढला आहे. ज्या दिवशी हे सँम्पल घेण्यात आले होते, त्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये केवळ पाच कोरोना बाधित रुग्ण होते. विशेष म्हणजे हे पाचही रुग्ण बाहेर जिल्ह्यातून प्रवेश करून बीड जिल्ह्यामध्ये आलेले होते. म्हणजेच आयसीएमआरने काढलेले निष्कर्ष प्रमाणे.


विशेष म्हणजे 21 मे रोजी जे सर्व्हेक्षण केले. त्यावेळी बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या केवळ 5 होती. ते देखील बाहेर जिल्ह्यातुन प्रवास करुन आले होते. त्यापुर्वीच बीड जिल्ह्यातील अँटीबाँडी तयार होण्याचे प्रमाण 1.01% आढळले. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की या व्यक्तींना कोरोना संसर्गाची सुरुवात ही आधीच झाली असावी. हे सर्व्हेक्षण शास्त्रशुद्ध पध्दतीने करण्यात आले होते. नमुने कुठले घ्यायचे हे देखील देशपातळीवर ठरवण्यात आले होते. आयसीएमआरचे जनरल डायरेक्टर बलराम भार्गवा यांचा सही असलेला अहवालाचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे सचिव प्रदीपकुमार व्यास यांना कळविला आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या संदर्भांमध्ये अनेक निष्कर्ष आता समोर येत आहेत.


राज्यातील सहा जिल्ह्यातील अहवाल




  • बीड जिल्ह्यातून 396 नमुने घेण्यात आले होते त्यात 4 पॉझिटीव्ह आढळून आले.

  • परभणीत 396 पैकी 6 पॉझिटीव्ह.

  • नांदेडमध्ये 393 पैकी 5 पॉझिटीव्ह.

  • सांगलीमध्ये 400 पैकी 5 पॉझिटीव्ह.

  • जळगावमध्ये 396 पैकी 2 पॉझिटीव्ह.

  • अहमदनगरमध्ये 404 पैकी 5 पॉझिटीव्ह.


Coronavirus | बीडमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल