LIVE UPDATE : NDRF ची टीम मुंबईहून महाडच्या दिशेने रवाना

 

LIVE UPDATE : NDRF च्या टीमला पाचारण

 

LIVE UPDATE : बोरिवली-राजापूर आणि जयगड-मुंबई एस

 

LIVE UPDATE : दोन एसटी बससह 7 ते 8 छोटी वाहनं बुडाल्याची माहिती
LIVE UPDATE : वाहून गेलेल्या दोन्ही एसटीमधील 22 प्रवासी बेपत्ता

 

महाड (रायगड) : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या पूल वाहून गेला आहे.  या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/760590474981679104

दोन एसटी, 7-8 वाहनं वाहून गेल्याची भीती

 

मध्यरात्री घडलेल्या या घटनेत पुलावरुन जाणारी वाहनं देखील पुरात वाहून गेली आहेत. वाहून गेलेल्या वाहनांमध्ये राजापूर बोरिवली आणि जयगड-मुंबई या दोन बस आणि 5 ते 7 गाड्यांचा समावेश आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/760584217180770304

काळोखामुळे बचावकार्यात अडथळा

 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल , पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पण, पाऊस आणि अंधारात शोधमोहिम सुरुच होऊ शकली नाही. काही वेळापूर्वीच एनडीआरएफची टीम देखील महाडच्या दिशेनं रवाना झाली असून उजेड पडताच वाहून गेलेल्या प्रवाशांची शोधमोहिम सुरु केली जाणार आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/760580605859934208

सध्या तरी किती प्रवासी पुरात वाहून गेले याचा कुठलाच अंदाज येत नाही. पण सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह बघता वाहून जाणाऱ्यांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.

 

वाहून गेलेल्या पुलावरुन गोव्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं जायची. परिणामी हा पूल वाहून गेल्यानं काही काळ मुंबई-गोवा वाहतूकही ठप्प झाली होती.

 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच सावित्री नदीच्या पुरस्थितीबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे.